रायगड: विजांच्या कडकडाने होणाऱ्या पावसामुळे शेतकरी आणि बागायतदार यांचं मोठं नुकसान झालं आहे. उकाड्याने हैराण झालेल्यांना दिलासा मिळाला तरी शेतकऱ्याचं मात्र नुकसान झालं आहे. याच पावसात एकट्य़ाने चिमुकला खेळायला गेला आणि तो घरी परतलाच नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिमुकल्यांकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्यावर संकट ओढवलं तर धोक्याचं ठरू शकतं. रायगडच्या तळा तालुक्यात अत्यंत हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. शेणवली इथं जिवंत विजवाहक तारेचा स्पर्श होऊन 10 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. 


गेल्या 4 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये तात्पुरता वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. शेणवली इथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात विजवाहक तार तुटून पडली होती. ही तार शेतात तुटून पडल्याची माहिती मिळाली आहे. 


शेतात खेळण्याच्या नादात 10 वर्षांच्या चिमुकल्याचा या तारेला स्पर्श झाला. वीजवाहक तारेचा धक्का लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.  खेळायला गेलेल्या ऋतिक चा या तारेला स्पर्श झाला आणि ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे हिलम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.