प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : रायगडमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हीणी घाटात एक खासगी बस उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. पुण्याहून कोकणात जात असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर तातडीने महाड, माणगाव इथून रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना करण्यात आल्या आहेत. या अपघातामध्ये काही प्रवासी जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याहून बस कोकणात येत असताना हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ताम्हिणी घाटात अवघड वळणावर बस उलटली आहे. या अपघातात बसमधील दोन प्रवासी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर काही प्रवासी जखमी असून काही प्रवासी बसमध्येच अडकले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महाड, माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटना स्थळाकडे रवाना झाल्या आहेत. कोंडेघर गाव हद्दीत हा अपघात झाल्याचे समोर आले आहे.


पुणे माणगाव मार्गावर ताम्हिणी घाटात खाजगी बसला झालेल्या अपघातात 2 महिला प्रवासी ठार झाल्या तर 55 प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस पुण्याहून हरीहरेश्वर येथे पर्यटकांना घेवून येत असताना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोंडेघर गावाजवळ अवघड वळणावर उलटली. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.