मुंबई : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरुन प्रकाश मेहतांना हटवण्यात आलं आहे. राज्यमंत्री आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची पालकमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.


मेहतांवर होते नाराज


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक कार्यकर्ते प्रकाश मेहतांवर नाराज होते. रायगडमध्ये मेहता हे पक्षाबद्दल भरीव काही करु शकले नाहीत. गृहनिर्माण विभागातील कामगिरीमुळे मुख्यमंत्री देखील मेहतांवर नाराज होते. त्यामुळे त्यांना हटवण्यात आल्याचं बोललं जातंय.


नवे पालकमंत्री


रविंद्र चव्हाण आता रायगडचे नवे पालतमंत्री असतील. चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले मानले जातात.