Raigad Crime News: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. 1500 किलो जिवंत जिलेटीन  आणि 70 किलो डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत. माणगाव पोलीसांकडून ही धडक कारवाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबर आणि नव वर्षाच्या आधी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे  रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


स्फोटकांची  बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिलेटीन आणि डेटोनेटरची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो पोलिसांनी पकडला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.


ख्रिसमस आणि थर्टीफर्स्ट च्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीसांची मोठी कारवाई 


थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डीटोनेटर जप्त करण्यात आली आहेत. या मालाची टेंपोतून बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत होती. माणगाव पोलिसांनी ही धडक कारवाई केलीय. या प्रकरणात आतापर्यंत तीन जणाना अटक करण्यात आली असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. ही स्फोटके पुण्यातून रायगडमध्ये आणत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.


रायगडमधील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजले


ख्रिसमसची सुट्टी आणि थर्टीफस्ट.. यामुळे पर्यटकांची पावलं कोकणाकडे वळू लागलीत आहेत. मुंबई, पुण्यातील पर्यटकांनी कोकणच्या समुद्र किना-यांकडे आपला मोर्चा वळवलाय. मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगडला पर्यटकांची पहीली पसंती देत आहेत. त्यामुळे रायगडमधील समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजलेत. अलिबाग , मुरुडसह श्रीवर्धनमध्ये पर्यटकाची गर्दी वाढलीये. पर्यटकांची संख्या वाढल्याने हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस हाऊसफुल्ल झाले आहेत.


ख्रिसमस, इअर एण्डला फिरायला जाताना गर्दीत काळजी घ्या


ख्रिसमस, इअर एण्डला फिरायला जाताना गर्दीत काळजी घ्या, असं आवाहन सरकारनं केलंय. कोरोना आणि नवा व्हेरियंट JN1 साठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीय. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्स चे प्रमुख असतील, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीय.