मुंबई : मुंबईकरांनी रविवारी घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे बदललेले वेळापत्रक पाहायला हवे. नाहीतर ऐनवेळी तुमची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. रेल्वे मार्ग, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हर हेड वायर दुरुस्तीसाठी कामासाठी रेल्वेच्या तीन्ही मार्गावर रविवारी 9 जून रोजी घेण्यात येणार आहे.  तर रविवारी सीएसएमटी ते कल्याण मार्गादरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य रेल्वे - कल्याण ते अंबरनाथ दरम्यान ब्लॉक असून उल्हासनगर आणि अंबरनाथ दरम्यान पूलाच्या गर्डरचे दुरुस्तीचे काम  सकाळी 10 ते सायंकाळी 4 परिणाम  कल्याण ते बदलापूर लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे. तर बदलापूर ते कर्जत विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत. 


हार्बर रेल्वे - सीएसएमटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी. 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत परिणामी वाशी-बेलापूर-पनवेलहून सुटणारी सीएसएमटी आणि वडाळा रोड लोकल, सीएसएमटीहून सुटणारी वाशी-बेलापूर-पनवेल, गोरेगाव आणि बांद्रा दरम्यानची
अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.  या प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला, पनवेल स्थानकातील प्लॅटफार्म क्रमांक 8 वरून पनवेलकरीता स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे.


पश्चिम रेल्वे - सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकातील पाचवी मार्गिकेवर ब्लाॅक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 परिणामी ब्लाँकदरम्यान काही लोकल रद्द


मध्य रेल्वे - कल्याण ते टिटवाळा स्थानकादरम्यान पाॅवर ब्लाॅक शनिवारी मध्यरात्री 12 ते 3 वाजेपर्यंत  परिणामी  शनिवारी मध्यरात्री 12.05 ची सीएसएमटी-अंबरनाथ लोकल रद्द