रेल्वे टीसीला स्थानकात प्रवाशाकडून मारहाण
तिकीट तपासण्यासाठी मागणी केल्यानंतर टीसीला कोपर स्थानकात मारहाण करण्यात आली.
ठाणे : तिकीट तपासण्यासाठी मागणी केल्यानंतर टीसीला कोपर स्थानकात मारहाण करण्यात आली. कोपर रेल्वे स्थानकावर तिकीट चेक करण्याच्या वादातून ही मारहाण झाली. सकाळी तिकीट चेकर भानू प्रताप यादव आपले वरिष्ठ टीसी जाणू वडवी सोबत प्रवाशांचे तिकीट तपासात होते.
तिकीट तपासनीदरम्यान किसन परमार या प्रवाशाला टीसी भानू प्रताप यादव याने रोखले आणि तिकीट दाखवण्यास सांगितले. किसनकडे तिकीट नव्हते. त्याने तिकीट मित्राकडे असल्याचे सांगितले. यावरून तिकीट चेकर आणि किसनमध्ये वाद झाला. या दोघामध्ये सुरु असलेला वादात मध्यस्थी करण्यास गेलेल्या वरिष्ठ टीसी जाणू वडवी यांना किसानने धक्काबुक्की करत मारहाण केली.
या मारहाणीमध्ये जाणू यांच्या हाताला मानेला मार लागला आहे. दुसऱ्या प्रवाशांच्या मदतीने किसनला पकडून डोंबिवली जीआरपीमध्ये नेण्यात आले. डोंबिवली जीआरपीने किसन विरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.