मुंबई : मुंबई लोकल आणि गर्दीचे वर्षानुवर्षाचे अतूट नाते आहे. ऑफिसला जाण्या-येण्याच्या वेळांमध्ये तर गर्दीची सीमा पार होते. पण गर्दीला सहन करणाऱ्या मुंबईकरांना त्याचवेळी वाढलेल्या तिकिटाचा भारही सहन करावा लागणार आहे. उपनगरीय लोकलची भाडे रचना मागणी व पुरवठा या तत्त्वानुसार कमी-अधिक करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याला मंजुरी मिळाल्यास गर्दीच्या वेळेस ही भाडेवाड होणार आहे. पुढच्या महिन्यापर्यंत कमिटीला रेल्वे मंत्रालयाला अहवाल सोपवायचा आहे. पुढच्या महिन्यापर्यंत कमिटीला रेल्वे मंत्रालयाला अहवाल सोपवायचा आहे.


काय आहे शिफारस ?


१ ) रेल्वेच्या उपनगरीय सेवांसाठी मागणी आणि प्रतिस्पर्धी सेवांच्या तुलनेत वेगळी भाडेरचना असावी 
२)  पिकअवर आणि नॉन पिकअवरमध्ये लोकलचे भाडे वेगळे असावे 


ओला, उबेरच्या तत्वावर निर्णय 


सध्या ओला आणि उबेरतर्फे मागणी व पुरवठ्य़ाच्या तत्त्वावर शहरातील टॅक्सीचे दर फ्लेक्सिबल करण्यात आले आहेत. ज्यावेळी मागणी जास्त असते त्यावेळी दर वाढतात आणि मागणी कमी असते त्यावेळी दर कमी होतात. त्याच तत्त्वावर ही भाडे रचना असणार आहे.


संशोधन सुरू


रेल्वेचे भाडे निश्चित करण्यासाठी ‘मिनिमम गव्हर्नमेंट ऍण्ड मॅक्झिमम गव्हर्नस’ या योजनेंतर्गत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एका समितीची स्थापना केली होती. या कमिटीतर्फे संशोधन करुन अहवाल तयार केला जाणार आहे. सध्या ही कमिटी उपनगरीय आणि कमी अंतराच्या रेल्वे सेवांचे भाडे ठरविण्याच्या सध्याच्या व्यवस्थेवर संशोधन करीत आहे. यासंबंधीचा संशोधन अहवाल पुढच्या काळात समोर येणार आहे.