मुंबई : Rain Alert  : राज्यात (Maharashtra) गेले तीन ते चार दिवस चांगला पाऊस (Rain) पडत आहे. उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात चांगला पाऊस झालाय. काही ठिकाणी नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आता पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. (Rains again in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या अनेक जिल्ह्यात चांगला पाऊस पडत आहे. कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. आता पुढील 4-5 दिवसांत महाराष्ट्रात पावसाची वाढ अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात  मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. येत्या 5 दिवसांत अपेक्षित पावसाचा इशारा देण्यात आलाय. 


आजही विदर्भातील अमरावती विभाग, संपूर्ण मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर पश्चिम मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.