राज्यात 4 दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट, मुंबई उपनगरांसाठी 24 तास महत्वाचे
कोकणमध्ये (Konkan) पुन्हा धो धो पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department (IMD) वर्तविला आहे.
मुंबई : राज्यात कोकणमध्ये (Konkan) पुन्हा धो धो पाऊस (Rain) कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील 24 तासात जोरदार मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department (IMD) वर्तविला आहे. तर मुंबई (Mumbai Rain) , ठाणे, पालघर, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस रेड आणि ऑरेंज अलर्ट असणार आहे. 23 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मुंबई, उपनगरांसाठी पुढील 24 तास महत्त्वाचे आहेत.
कोकण विभागातील मुंबई आणि इतर जिल्ह्यांत भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) 'रेड अलर्ट' बजावला असून येत्या 24 तासांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भातील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रविवार रात्रीपासून पावसाची संततधार कायम आहे. पुढील 48 तास मुंबईसह उपनगरात आणि शेजारील जिल्ह्यात मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. दरम्यान सोमवारी पावसाने पुन्हा एकदा मुंबईला वेठीस धरल्याचे पाहायला मिळाले. पावसाची कोसळधार कायम राहिल्यानं अनेक सखल भागांत पाणी साचले होते. लोकल रेल्वे सेवा आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला. आता कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झाली आहे.