COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे : धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी बाळापुर शिवारात शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहणाऱ्या पावरा कुटूंबातील तीन लेकी आणि त्याच्या आईवर काळाने घाला घातला. वादळी वाऱ्यासह सलग चार तास सततधार सुरु असलेल्या पाऊसाने या कुटूंबाचा घात केला.


ज्या पत्र्याच्या शेडमध्ये पावरा कुटूंब राहत होत त्या शेडवर वादळामुळे झाड कोसळले. त्यात दबून आईसह तिघा लेकींचा जीव गेला. या घटनेची माहिती मिळताच मदतीसाठी लोक धावले. मात्र पाऊसामुळे आणि वीज नसल्यामुळे मदत करण्यात अडचणी येत होत्या. 


दादुराम पावरा शेताची राखण करण्याचे काम करत होते. अनिता पावरा त्यांची मुलगी वशिला, पिंकी आणि रोशनी पावरा ही अशी मृतांची नाव आहेत. या दुर्घटनेत दादुराम मात्र वाचले.