धुळे : तब्बल 45 दिवसांच्या प्रतिक्षेनंतर धुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी संततधार तर कुठे मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. राज्यात इतर भागात जोरदार बरसणाऱ्या पावसाने मात्र धुळे जिल्ह्यात चांगलीच दडी मारली होती. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बरसलेला पाऊस गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाऊसच नसल्याने पीक करपायला लागली होती. त्यात जिल्ह्यातील धरणांनी देखील तळ गाठायला सुरवात केलीये. दरम्यान पोळा सणाच्या तोंडावर पावसाने संततधार का होईना पण हजेरी लावल्याने शेतकरी सुखावलाय. पिकांना जीवनदान मिळण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता असून जिल्ह्यातील शेतकरी अजून दमदार पावसाची प्रतीक्षा करतायेत.