Rain in Maharashtra : अवकाळी पाऊस आणि गारपीटने शेतीचे नुकसान, शेतकरी हवालदिल
Rain in Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग केली. (Rain in Nashik) नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने नाशिक आणि सोलापूर जि्ह्यात शेतीपिकांचं मोठे नुकसान झाले आहे.
Rain in Maharashtra : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील गोदाकाठ परिसरात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग झाली. (Rain in Nashik) अवकाळी पावसाने नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, शेतकरी हवालदिल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यंदा देशात मान्सून सामान्य असेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. सरासरीच्या 96 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. अल निनोचं संकट असताना हवामान विभागानं मात्र दिलासादायक अंदाज वर्तवलाय. तर स्कायमेटनं 94 टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शेतकरी हवालदिल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मार्च, एप्रिलमधील अवकाळी, गारपीट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून हेक्टरी 50 हजार आणि फळबागांसाठी हेक्टरी 1 लाखांची मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर पशुधन आणि घरांच्या नुकसानीसाठी NDRF निकषाच्या दुप्पट मदत जाहीर करण्याचीही मागणी केली आहे.
निफाड तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस
नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून निफाड तालुक्यात गोदाकाठावर चांदोरी, सायखेडा, शिंगेवे, करंजगाव, चापडगाव, म्हळसाकोरे या गावात वादळी वा-यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्ष, कांदा, गाजर या पिकाचं अतोनात नुकसान झाले आहे.
चौथ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
नाशिक जिल्ह्यामध्ये सलग चौथ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. संध्याकाळी नाशिक शहरात मुसळधार पाऊस बरसू लागला. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. नाशकात गारपीट आणि अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर जाऊन आमदार सुहास कांदे यांनी पाहणी केली. गारपीट आणि अवकाळी पावसाने नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण, जातेगाव, जवळकीसह घाटमाथा परिसरात मोठं नुकसान झालंय. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश आमदार कांदे यांनी दिले.
भिमाशंकरमध्ये गारांचा पाऊस
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकरमध्ये गारांचा पाऊस पडला. मंदिर परिसरात तुफान गारपीट झाली. गेल्या 2 दिवसांपासून उत्तर पुणे जिल्ह्यात वादळीवा-यासह गारपीट होतेय. आता डोंगरमाथ्यावरही गारपिट झाली. गारपिटीमुळे भीमाशंकरमध्ये येणा-या भाविकांची धावपळ झाली.
सोलापुरात पावसामुळे 26 गावे बाधित
सोलापूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 26 गावे बाधित झाली आहे. जिल्ह्यातल्या माळशिरस, मोहोळ, बार्शी, करमाळा, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यात नुकसान झालंय. मका, पपई, बाजरी, द्राक्ष, आंबा, केळी, टोमॅटो पिकांचं नुकसान झाले आहे. अवकाळी आणि गारपिटीने धाराशिव जिल्ह्यात शेती पिकाचे अतोनात नुकसान झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाराशिव जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. धाराशिवमध्ये अडीच हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित झालंय. तुळजापूर तालुक्यातील मोरडा गावात नुकसानीच्या व्यथा सांगताना शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आले.