रत्नागिरी : जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्याने आंबा पिक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकरी आणि आंबा बागायत चिंतेत आहेत. जिल्ह्यात ढगाचे सावट पसरले आहे. संगमेश्वर, धामणी येथे गारांचा पाऊस झाला. हा पाऊस लांजा, रत्नागिरी, पुढे राजापूरकडे सरकताना दिसत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले आंबा पीक हातचे जाण्याची भीती व्यक्त होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उकाड्याने हैराण झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे गारांचा जोरदार पाऊस पडला. जवळपास अर्ध्यातासाहून अधिक वेळ हा पाऊस पडला. गेले चार दिवस जनता उकाड्याने त्रस्त झाली आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरणही होते. अशातच सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली.


विशेष म्हणजे संगमेश्वर तालुक्यातील धामणी परिसरात गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाने आंबा पीक धोक्यात आलं असून आंबा बागायतदार चिंताग्रस्त झाला आहे. या पावसामुळे हवेत मात्र गारवा आला होता. दरम्यान, पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव तालुक्यातील अनेक भागाला अवकाळी पाऊसाने आज झोडपले.