मुंबई : Rain News Update: राज्यात येत्या 48 तासात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. (Rain In Maharashtra) 5 ते 11 ऑगस्ट या काळात राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकण, गोवा, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 


मुंबईतही मुसळधार पावसाची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतही 7 आणि 8 ऑगस्टला मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Heavy Rain In Mumbai) अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मान्सूनचं पुनरागमन होणार आहे. बंगालच्या उपसागरात येत्या 48 तासाच नवे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने विदर्भ मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुण्यातही मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट


 राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय झाला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर मुंबई आणि उपनगरात तुरळक पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत आहे.  आता हा पाऊस पुढील काही दिवसांपासून सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे ( Weather Update) पुढील तीन दिवस राज्यातील विवध भागात पाऊस बसरणार आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना शुक्रवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra weather update: IMD says Konkan Area likely to receive rain)


आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.तर 6 ऑगस्टला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे.


तर, 7 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.