Rain Alert : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, त्यानंतर उष्णतेची लाट
Heat waves and rain alerts : राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे.
मुंबई : Heat waves and rain alerts : राज्यात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस अधिक राहणार आहे. अरबी समुद्रात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हिमालयाच्या पायथ्याशी झालेल्या हवामान बदलामुळे राज्यात पुढील 2 दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दोन दिवस पाऊ झाल्यानंतर पुढील पाच दिवस मात्र 29 एप्रिल ते 2 मेपर्यंत उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या भागात 27 आणि 28 एप्रिलला हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेल्या 24 तासांत कोकणात जोरदार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जना आणि गारांसह पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भात कोरडं हवामान होतं.
जळगाव, नाशिक, नगर या भागांत उष्णतेची लाट तीव्र राहणार आहे. आगामी पाच दिवसांत 29 एप्रिल ते 2 मेदरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट तीव्र होणार आहे असंही हवामान विभागाने म्हटले आहे.