Raj Thackeray : अमेरिका दौ-यानंतर राज ठाकरे सक्रिय झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईत मिशन वरळी हाती घेतल्याची चर्चा सुरू आहे.  वरळीतील नागरिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेतली. तसेच बीडीडी चाळ रहिवासी, पोलीस वसाहतीमधील रहिवासी, विविध सामाजिक संघटनांचे लोक राज ठाकरे यांच्या भेटी घेत आहेत. दरम्यान वरळीतील काही कार्यकर्त्यांचा मनसेत पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मिशन वरळीची चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरे हे वरळीचे आमदार आहेत. संदिप देशपांडे मनसेकडून इच्छुक आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं स्वबळाचा नारा दिलाय. त्यानुसार मनसेच्या संभाव्य उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. संभाव्य उमेदवारांना आपल्या मतदारसंघात कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या गेल्यात. 225 ते 250 जागांवर मनसे उमेदवार उभे करणार आहे. 


यापैकी मुंबईतील शिवडीतून बाळा नांदगावकर, वरळीतून संदीप देशपांडे, माहीममधून नितीन सरदेसाई, जोगेश्वरीमधून शालिनी ठाकरे यांच्या नावांची चर्चा आहे. तर  कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे एकमेव विद्यमान आमदार राजू पाटील यांचं नाव आघाडीवर आहे. पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघात साईनाथ बाबर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे 


मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय...वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणार आहे...साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेट्स ठेवत त्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती दिलीय.


अंत्यसंस्कार पद्धतीवरील राज ठाकरे यांच्या विधानावरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केलाय. सगळ्या सूचना हिंदू समाजालाच का? ...बकरी ईदला बकरी कापू नका अशी सूचना का केली जात नाही?...हिंदू समाजातील परंपराना कोणी ही हात लावू नये असं नितेश राणेंनी म्हटलंय...हिंदू धर्मात अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडं जाळली जातात... हिंदू धर्मातील ही परंपरा बदलण्याची गरज आहे, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलं होतं...यावरून नितेश राणेंनी सवाल उपस्थित केलेयत...