Raj Thackeray Khalapur Toll Video : पिंपरी चिचंवड येथील शंभरावा अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर अचानक टोलनाक्यावर उतरले. टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या टोलवर पाच किलोमीटरच्या रांगेत तासन तास ट्रॅफीकमध्ये अडकल्या होत्या. लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले अन् अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता करुन दिला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचं पहायला मिळालं. राज ठाकरे यांनी तासनतास अडकलेला ट्राफीक काही क्षणात सोडवलं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने याआधी देखील टोलविरोधात राज्यभर आंदोलन केली होती. अशातच आता ट्रॅफिक जाम पाहिल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वत: हातात घेतली आणि गाड्या सोडून दिल्या. त्यामुळे अडकलेल्या अँम्बुलन्सचा रस्ता मोकळा झाला. राज ठाकरे स्वत: उतरल्याचं पाहून कॉन्ट्रॅक्टरची तारंबळ उडाली होती. मनसेचे पदाधिकारी देखील त्यावेळी उपस्थित होते. तब्बल 5 किलोमीटर झालेल्या वाहतुक कोंडीमुळे राज ठाकरे संतापल्याचं पहायला मिळालं. त्यावेळी राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांना तंबी देखील दिली.


व्हिडीओ पाहण्यासाठी इथे करा >


परत बांबू लावला तर सगळ्यांना बांबू लावेल, असं म्हणत राज ठाकरे यांनी स्थानिक कॉन्ट्रॅक्टरला दम भरला. "टोलनाक्यावर निर्लज्ज कॉन्ट्रॅक्टर टोल घेण्यात व्यस्थ होते. मात्र, तिथंच अँब्युलन्स उभी होती, हे त्यांना दिसलं नाही. राज ठाकरे यांनी स्वत: चालत पुढं गेले अन् गाड्या सोडल्या. महाराष्ट्र सैनिक जर स्वत: रोडवर उतरला तर एक रुपया सुद्धा टोल घेतला जाणार नाही. तुम्ही पैसे कमवण्यासाठी नाही. सरकारवर महाराष्ट्राच्या जनतेची जबाबदारी आहे", असं मनसे नेते अविनाश अभ्यांकर यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी केली जातेय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने बैठका घेऊन आढावा घेतला आहे. अशातच आता टोलच्या मुद्द्यावरून पुन्हा रान पेटणार की काय? असा सवाल विचारला जातोय.