आशीष अम्बाडे, झी मीडिया,चंद्रपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आठ दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर (Vidarbha Tour Raj Thackeray) आहेत. राज ठाकरे सध्या चंद्रपूर दौऱ्यावर असून सोमवारी संध्याकाळी चंद्रपूरमध्ये दाखल झाल्यावर कार्यकर्त्यांची त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. शहरात रात्री मुक्कामाच्या हॉटेलमध्ये पोहचल्यावर राज ठाकरे यांनी चार केक खरेदी केले.  (Raj Thackeray Bought Four Cakes in Chandrapur)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरेंनी एन.डी. हॉटेल येथील केक शॉपमध्ये (Raj Thackeray Bought Four Cakes) जात स्वखर्चाने 4 वेगवेगळ्या केकची खरेदी केली. यावेळी केक शॉपच्या मालकाने राज ठाकरेंच स्वागत केलं. चार केक घेत त्यानंतर ते त्यांच्या रूमच्या दिशेने रवाना झाले. राज ठाकरेंनी चार केक घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात ठाकरे कोणाचा केक कापणार या चर्चांणा उधाण आलं आहे. या केक खरेदीची चर्चा उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. 
 
राज ठाकरेंनी केक शॉपमधून चॉकलेट (Chocolate), पायनापल (Pineapple) आणि बटरस्कॉच (Butterscotch) फ्लेवरचे केक घेतल्याची माहिती समजत आहे. राज ठाकरे यांनी स्वत: केक शॉपमध्ये जाऊन केक घेतल्याने याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. केक का घेतले याबाबत त्यांना विचारलं असता, केक खरेदी करण्याचं काही विशेष असं कारण नसल्याचं ठाकरेंनी सांगितलं. 


दरम्यान, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहरातील प्रस्थापितांविरोधात संघर्ष करा, अशा सूचनाही दिल्या. मनसेला विदर्भात पुन्हा पुनजिर्वित करण्यासाठी राज ठाकरे दौरा करत असल्याचं दिसत आहे.