Raj Thackeray: आधी पारशी होतो, मग मुस्लिम झालो, आता हळूहळू हिंदू होतोय...राज ठाकरे यांना म्हणायचं तरी काय?
Raj Thackeray: सध्याचं राजकारण आणि राजकारण्यांवर राज ठाकरेंनी जोरदार टीका केली आहे. राजकारणाचा नाला झालाय त्यामुळे कोणत्याही पक्षात गेले तरी हरकत नाही, मात्र, तरूणांनी राजकारणात यावं असं आवाहन राज ठाकरेंनी केले आहे.
Raj Thackeray Interview : गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Interview) यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मुलखतीत राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यावर बेधडकपणे भाष्य केले. हिंदूत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. मला माझं हिंदूत्व सिद्ध करायची गरज नाही. एक कडवट हिंदूत्ववादी आहे असे स्पष्ट मत मांडले.
लोकमान्य सेवा संघ यांच्या शतकांपूर्ती सोहळ्या निमित्ताने अंबरीश मिश्रा यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे यांना हिंदूत्वाच्या मुद्द्याबबात प्रश्न विचारण्यात आला. मी आधी पारशी होतो, मग मी मुस्लिम झालो, आता हळूहळू मी हिंदू होतोय... अस काही नाही. माझा जन्म एका हिंदी कुंटुंबात झाला आहे. मी एक कडवट हिंदूत्ववादी आहे असे राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांच्या मुलाखतीमधील महत्वाचे मुद्दे
सध्याच्या राजकारणात मी मिसफट आहे.
महाराष्ट्राची परिस्थिती घाण आहे. अशी परिस्थिती मी कधीही पाहीली नाही.
1985 च्या आधी आणि नंतरचे राजकारण वेगळे आहे.
श्रीमंत आणि गरिबीमधील दुवा गेला आहे. मध्यमवर्गावर आता चित्रपट पण येत नाहीत
मी अपघाताने राजकारणात आलो
मला आताचे राजकारण खूप मिस करेक्ट वाटते
महाराष्ट्राचे असे राजकारण इतके घाणेरडे राजकारण कधीच पाहिले नाही
या घाणेरड्या राजकारणाचा वीट आला आहे.
ज्या महाराष्ट्राने देशाचे प्रबोधन केले त्या महाराष्ट्रावर विचित्र वेळ आली आहे.
1995 च्या अगोदरचा आणि 1995 नंतरचा महाराष्ट्र वेगळा आहे.
1995 नंतर भारतात चॅनल, इंटरनेट असं सगळं येत गेलं
राजकारण चळवळी अशा अनेक गोष्टींमधून सुशिक्षित वर्ग यातून बाहेर पडला.
त्यामुळे श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दुवा हरवून गेला
1995 च्या आधीचा सर्व काळ काढा कोणतीही राजकीय चळवळ घ्या
नंतर सुद्धा एक मध्यमवर्ग आला. पण त्यात अनेक लोक शिकलेले नव्हते आणि त्यामुळे तो गॅप तयार झाला
हा संपूर्ण मोठा वर्ग पुन्हा राजकारणात यायला पाहिजे
हे असंच राहिलं तर महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती ही बिहार उत्तर प्रदेश सारखी होईल. याची मला खूप भीती वाटते.
मी जगभरातील संगीत ऐकतो. माझ्या वाकिलांनी माझं नाव स्वराज ठेवलं आहे.
मला व्यंगचित्रकार व्हायचे होते पण त्याचा बाप माझ्याच घरात बसला होता. म्हणून मी कॉलेज सुद्धा सोडले
वर्ल्ड डिज्नीमध्ये जाऊन ॲनिमेटर होण्याची इच्छा होती.
माझी वर्तमानपत्र काढायची इच्छा आहे, मी काही तरी नवीन देईल
कलाकार फक्त लिहून दिलेले बोलतात, राजकारणी दिवसभर वाटेल ते बोलतात
मला हेमामालिनी मला आवडतात. त्यांच्या चेहऱ्यावर पावित्र्य आहे, त्यांच्यात व्यंगचित्र काढावे असे व्यंग नाही.