Raj Thackeray: 50 फुटांचा हार अन्...; राज ठाकरेंच्या स्वागतासाठी NCP च्या सरपंचानं केली जय्यत तयारी
Raj Thackeray Gopinath Gad: परळी कोर्टाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधातील (Raj Thackeray Warrent) अटक वॉरंट रद्द केलं आहे. कोर्टात हजर राहिल्यानंतर राज गोपीनाथ गडाला भेट देणार असून यासाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने जय्यत तयारी केली आहे.
Raj Thackeray Latest News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS Chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांना परळी कोर्टाने (Parali Court) मोठा दिलासा दिला आहे. राज यांनी कोर्टात हजर झाले आणि कोरोना कालावधीमुळे न्यायालयात यापूर्वीच्या सुनावण्यांना हजर राहू शकलो नाही असं सांगितलं. यानंतर राज यांच्याविरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आलं. मात्र त्यांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 2008 साली राज ठाकरेंना अटक करण्यात आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली होती. राज कोर्टातून बाहेर पडताना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. राज आता गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) जाणार असून येथे स्वागतासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्याने स्वागताची जंगी तयारी केली आहे.
पांगरी (Pangari) येथील गोपीनाथ गडावर (Gopinath Gad) राज ठाकरे आज दुपारी भेट देणार आहे. या ठिकाणी त्यांच्या भव्य स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पांगरी येथील सरपंच सुशील कराड यांच्या हस्ते राज यांचं स्वागत केलं जाणार आहे. विशेष म्हणजे क्रेनच्या सहाय्याने राज यांना हार घालत त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. राज यांना क्रेनच्या सहाय्याने घातला जाणारा हार हा 50 फुटांचा आहे. हा भव्यदिव्य हार बनवण्यासाठी दहा क्विंटल फुलांचा वापर करण्यात आला आहे.
सुशील कराड यांनी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी त्यांचे मोठ्या आकाराचे बॅनर्सही लावले आहेत. पांगरी हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. या मतदारसंघातील भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यातील राजकीय कलगीतुरा कायमच चर्चेत असतो.