Raj Thackeray: शिवसेना (Shiv sena) आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला पार पडणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राज ठाकरेंच्या मागणीवर फडणवीसांनी सावध भूमिका घेतली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी थेट वक्तव्य केलंय.


राज ठाकरे यांची भूमिका -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी विनंती भाजपला केली आहे. ही निवडणूक बिनविरोध झाली तर देशभर एक संदेश जाईल, असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सावध भूमिका घेतली होती.


फडणवीसांचं उत्तर -


राज ठाकरेंच्या पत्राचा (Raj Thackeray Letter) जरी विचार करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांची देखील चर्चा करावी लागेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. मुख्य म्हणजे आमच्यासोबत बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv sena) आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी देखील मला चर्चा करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले होते.


राज ठाकरेंचं प्रत्युत्तर -


फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी रोखठोक भूमिका मांडली. उमेदवारांनी उभा नाही केला तर महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल. भाजपमध्ये ढवळाढवळा करण्याचा माझा प्रयत्न नाही. मी फक्त त्यांना विनंती करू शकतो. ऐकायचंय त्यांनी ऐकावं, नाहीतर सोडून द्यावं, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.


आणखी वाचा - Raj Thackeray: ठाकरेंच्या 'राज' पत्रावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजप उमेदवार मागे घेणार ?


दरम्यान, राज ठाकरे यांच्यासह शरद पवारांनी देखील निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता भाजप नेमकी कोणती भूमिका घेणार? पोटनिवडणुकीतून ऋतुजा लटकेंविरोधात भाजप माघार घेणार की नाही?, असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.