Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचं सिनेमाविषयीचं प्रेम सर्वांनाच माहिती आहे. 'अथांग' या मराठी वेब सीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी अनेक खुलासे केले आहेत. अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने (Tejaswini Pandit) राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी (Raj Thackeray Interview) मनमोकळी उत्तरं देखील दिली.


सिनेमा की वेबसिरीज?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एखादा सिनेमा (Cinema) पहायला आवडतो की वेबसिरीज (Web Series) असा सवाल राज ठाकरेंना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी मी सीरिजवाला माणूस नाही. मी फिल्मवाला माणूस आहे, असं उत्तर दिलं. तुम्हाला जे काही सांगायचंय ते 2 ते 3 तासात सांगून टाका, फार रेंगाळत बसू नका. मी आत्तापर्यंत दोन चार सिरीज पाहिल्या असतील, असं ठाकरे म्हणाले. मी नुकतीच 'द ऑफर' नावाची एक वेब सीरिज पाहिली आणि ती मला पुन्हा पाहावी, असं वाटतंय, असं राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.


पहिलं पॅशन काय?


या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी धक्कादायक खुलासा केला. मी अपघातानं राजकारणात आलो असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात केलं. फिल्ममेकींग हे माझं पॅशन आहे, असंही ते यावेळी म्हणाले. माझ्या घरामध्ये एक ड्रोबो मशीन (Drobo Machine) आहे. त्यात एकूण साडेनऊ हजार फिल्म आहेत त्या मी पाहतोय, असंही ते म्हणाले.


आणखी वाचा - Eknath Khadse: "निखिलने आत्महत्या केली तेव्हा... गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे?", खडसेंचा सवाल!


ओटीटीच्या सेन्सॉरशिपवर बंधनं हवी?


दरम्यान, प्रत्येकजण आपापल्या परीनं काम करत असतो. ओटीटीवर (OTT) नेमकं काय दाखवणार हे काही कळत नाही. इतर भाषांतील वेगवेगळ्या गोष्टींचं आपण अनुकरण करतो मात्र त्याविषयी काही बदलही जाणून घेतले पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी यावेळी मांडलं. चित्रपट आणि सिरीजची गरज असेल तर बंधनं असू नयेत. कुठल्या चित्रपटावर किंवा सिरीजवर बंधनं (Censorship) आली असेल तर मला कळवा असंही यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.