इस्लामपूर  : इस्लामपूर येथील जयंत पाटील खुल्या नाट्यगृहात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शेलकी शब्दात टीका केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात भव्य स्वरूपात ही सभा झाली. या सभेत बोलताना गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'आपला देश धर्मांधतेकडे वाटचाल करीत आहे. असे झाल्यास भारताचा, पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. धर्मांधता कधीच विकासाचा मार्ग दाखवू शकत नाही. आपल्या आजूबाजूचे देश धर्मांधतेकडे झुकले आणि उद्ध्वस्त झाले आहेत, असे सांगितले.


पुरंदरे आणि जेम्स लेन यांना निष्कारण तुम्ही उकरून बाहेर काढलंय. मग आता मी त्यांची हाड मोजायला लावणार. शिवाय पुरंदरे आणि जेम्स लेन आताच पुढे कसे आले, हा एक मोठा ट्रॅप आहे, असा आरोपही आव्हाड यांनी केला. 


याच सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी 'भाजपच्या सीडी लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यात तीच सी डी घुसली आहे. ईडीचा परिणाम असा झाला आहे की, लाव रे ती सी डी म्हणणारे, आता कुठं आहे रे सीडी असं म्हणत आहेत,' असा टोला त्यांनी लगावला. 


राज ठाकरे म्हणजे बोलक्या भावल्यांच्या कार्यक्रमातील ''अर्धवटराव'' आहेत, अशा शेलक्या शब्दात त्यांनी राज यांच्यावर टीका केली.