मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. १ आणि २ ऑक्टोबर रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा पुणे दौरा असणार आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात मनसे शाखा अध्यक्षांचा मेळावा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे मनसे नेते अमित ठाकरे हे देखील १ ते ३ ऑक्टोबर रोजी कल्याण डोंबिवली दौरा करणार आहेत. आगामी महानगरपालिका आणि संघटनात्मक बांधणीसाठी हा दौरा असणार आहे.


पुणे महानगरपालिकेची निवडणूक (Pune municipal elections) काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपलं संपूर्ण लक्ष पुण्यावर केंद्रीत केलंय. राज ठाकरे यांचा हा आठवा पुणे दौरा आहे.


पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी मनसे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. दुसरीकडे भाजप-मनसे युतीबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजप आणि मनसेची युती होते का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.