Raj Thackeray : 'मनसे'चा वर्धापनदिनाचा मेळावा यंदा पुण्यात होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घातला आणि राज्यातील राजकारणावर जोरदार टीका केली. यावेळी जातीयवादावरुन त्यांनी सर्वच पक्षांना धारेवर धरलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यपालांवर टीका


राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावर जोरदार टीका केली. शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी तुम्हाला माहित आहेत का? असा सवाल त्यांनी केली. 'अभ्यास नसताना नुसतं बोलून जायचं. महाराजांनी कधी सांगितलं नाही ते माझे गुरु आहेत आणि रामदास स्वामींनी ते माझे शिष्य होते असं म्हटलं नव्हतं. पण शिव छत्रपतींबद्दल त्यांनी जे लिहिलंय त्या पेक्षा चांगलं कोणी लिहिलेलं मी वाचलेलं नाही.'


'आमच्या महापुरुषांना बदनाम केलं जातं. पण निवडणुका होत नाहीत हे कळल्यावर मग सगळे शांत झाले. निवडणूक आली की ती चढायला लागते. याचा अर्थ काय हे कळालं असेल तुम्हाला. निवडणूक वातावरणात दिसते. ओबीसी आरक्षणाचं कारण पुढे करण्यात आलं. मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नाहीये. पण खरं कारण तेच आहे. 3 महिने निवडणुका पुढे ढकलतो. नंतर पाऊस सुरु होईल. पण लोकांना निवडणुका नकोय. लोकांना कोणतंही देणं- घेणं नाही. फक्त उभे राहणाऱ्यांमध्येच उत्साह आहे.'


'आतापासून बोरं वेचून ठेवली आहेत. पण या निवडणुका होऊच नयेत. प्रशासक पण हातामध्ये आणि कारभार पण हातामध्ये. 14 एप्रिलला परीक्षा संपल्या की सगळे बाहेर निघून जाणार. मत मागायला जाणार कोणाकडे. निवडणुका दिवाळीनंतरच होतील.' असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय.