विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद दौऱ्यात काय केलं. महापालिकेची चाचपणी केली. कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि महत्त्वाचं म्हणजे औरंगाबादच्या नामांतर वादाला फोडणी घातली. औरंगाबादचं नाव बदलण्यात हरकत काय आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे आज औरंगाबादेत आले आता ते शनिवारी परतणार आहेत. राज ठाकरे महापालिका निवडणुकीच्या चाचपणीसाठी गुरुवारी रात्री औरंगाबादमध्ये पोहोचले तेव्हा त्यांचं भव्य स्वागत झालं. 


खरं तर ते रविवारपर्यंत थांबणार होते पण आता ते शनिवारीच मुंबईला परतणार आहेत. या दौऱ्यादरम्यान रंगला तो औरंगाबादच्या नामांतराचा वाद.


फक्त झेंडा बदलला, भूमिका बदलली नाही असं म्हणत हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांनी कधी भूमिका घेतली का? असा प्रश्न राज ठाकरेंनी शिवसेनेला विचारला.


या दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकीची चाचपणी करत काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केली... नामांतराच्या वादाला फोडणी दिली आणि दीड दिवसाचा दौरा संपला.