ठाणे :  मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः जातीनं पक्ष संघटनेकडे लक्ष देत आहेत.  आगामी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तयारी सुरू केली आहे. आज राज ठाकरे दिवसभर ठाण्यामध्ये होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संजीवनी देण्यासाठी अध्यक्ष राज ठाकरेंनी कंबर कसली आहे. राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या आज झालेल्या बैठकीनंतर पक्षात आवश्यक केले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


ठाण्यातील रेस्ट हाऊसमध्ये मुख्य पदाधिकारी यांची बैठक घेऊन नंतर शहनाई हॉल येथे उपशाखाध्यक्ष आणि गटाध्यक्ष यांची विभागवार बैठक घेतली गेली.


राज ठाकरे यांनी ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या विभागवार बैठका घेतल्या. यावेळी मनसेचे संदीप देशपांडे, ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष अभिजीत पानसे उपस्थित होते.