मुंबई :  'रयतेचा राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. कोल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धनंज महाडीक यांनी शाहू महाराजांना भारतरत्न या पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मान करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिवाळीनिमित्त महाडीक यांनी सर्वांनाच शाहू महाराजांचं इंग्रजीतून उपलब्ध असणारा चरित्रात्मक ग्रंथही त्यांनी अनेक खासदारांना भेट स्वरुपात पाठवला. 


यापूर्वीच शाहू महाराजांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवणं अपेक्षित होतं. पण, निदान आतातरी सरकारने त्या दृष्टीने पावलं उचलावीत अशी मागणी त्यांनी केली आहे. 


'गेल्या अधिवेशनामध्ये मी लोकसभेत याविषयीची मागणी केली होती. कोल्हापूरातील स्थानिक, संस्थानिक यांनाही त्यासंबदर्भातील मागणी करणारी पत्रं पंतप्रधानाना पाठवण्याचं आव्हान केलं होतं', असंही महाडीक यांनी सांगितलं. 


राजर्षी शाहू महाराजांचं कर्तृत्व हे फक्त उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रापुरताच मर्यादीत न राहता ते संपूर्ण देशभरात पोहोचवणं हाच आपला मानस असल्याच महाडीक यांनी स्पष्ट केलं. तेव्हा आता त्यांच्या या मागणीला सरकार दरबारी दाद मिळणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.