ब्राम्हण समाजाविरोधात आक्षेपार्ह विधान, राजू शेट्टींनी मागितली माफी
राजू शेट्टी यांनी भारतीय सैन्यदलावरुन ब्राम्हण समाजाविरोधात अक्षेपार्ह विधान केलं होतं.
मुंबई : भारतीय सैन्यदलावरुन जातीपातीचं राजकारण करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांनी अखेर माफी मागीतली आहे. हातकणंगले इथल्या हेरले गावात झालेल्या सभेत राजू शेट्टी यांनी ब्राम्हण समाजाविरोधात अक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर खासदार राजू शेट्टींचा ब्राम्हण सभेनं निषेध केला. येत्या निवडणुकीत शेट्टींना त्यांची जागा दाखवून देऊ असा निर्धार इचलकरंजी शहरातील ब्राह्मण सभेनं केला आहे. ब्राह्मण सभेच्या निषेधानंतर राजू शेट्टींनी दिलगिरी व्यक्त केली आहे. शहिदांचा दर्जा मिळत नसलेल्या BSF आणि CRPF जवानांसाठी हे वक्तव्य केल्याची सारवासारव त्यांनी केली.
दरम्यान झी 24 तासच्या रणसंग्रमात लोकसभेचा या कार्यक्रमातही त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. त्यानंतर स्वाभीमानीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी राजू शेट्टींच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली. या कार्यक्रमात काय घडलं होतं.