पनवेल : शेतक-यांचा सात-बारा उतारा कोरा करा, शेतक-यांना कर्जमुक्ती द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, या आणि इतर मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजू शेट्टींनी पुण्यातून सुरु केलेल्या आत्मक्लेश यात्रेनं आतापर्यंत 127 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. दरम्यान सलग 6 दिवस पायी चालल्यानं खासदार राजू शेट्टींची प्रकृती खलावली आहे. त्यांचे पाय सुजले असून पायांना फोडही आले आहेत. तसंच त्यांचा रक्तदाबही कमी झाला आहे. 


सरकारने निवडणुकीपूर्वी शेतक-यांचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिलं होतं. मात्र आता सरकारला शेतक-यांचा विसर पडला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.