धुळे :  भाजपा सरकारसाठी महाराष्ट्रभर बोंबलत मत मागितल्याची सर्वाधिक शरम आपल्याला वाटत असल्याची खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. सरकारी अनास्थेचे बळी ठरलेले धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांच्या विखरण या गावी शेतकरी सन्मान यात्रेचा प्रारंभ झाला. या वेळी शेट्टी बोलत होते. भाजप सरकार आणून भाकरी करपू नये म्हणून परतवली मात्र या सरकारने तवाच करपून लावल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. यावेळी त्यांनी धर्मा पाटील प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


'भाजपला लाज वाटली नाही का?'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, यावेळी बोलताना शेट्टी यांनी शेतकऱ्याच्या जमीनी हडपणाऱ्यांवरही आरोप करीत धर्मा पाटील प्रकरणात सदोष भनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही सन्मान यात्रा प्रसिध्दीसाठी असल्याचा आरोप खंडीत करत संघटनेची मदत घेताना भाजपला लाज वाटली नाही का? असा सवाल त्यानी उपस्थित केला. 


शेती प्रश्नासाठी भाजप सरकारला विरोध


२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भारतीय जनता पक्षासोबत आघाडी केली होती. या निवडणुकीत खा. राजू शेट्टी यांनी भाजपसाठी मते मागितली होती. या निवडणुकीत सरकारला जनतेने कौल दिला आणि भाजप सरकार सत्तेवर आले. मात्र, शेतीचे प्रश्न आणि भाजप सरकारची धोरणे या मुद्द्यांवर मतभेद झाल्याने खा. शेट्टी यांनी सरकारपासून फारकत घेतली आहे.