पालघर : RajyaSabha election राज्यसभा निवडणुकीत आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजप ( BJP ) आणि शिवसेना ( Shivsena ) या दोन पक्षात चुरस लागली आहे. भाजप आणि शिवसेनेला आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मते कमी पडत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमी पडणाऱ्या मतांसाठी या दोन्ही पक्षांची मदार अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांवर अवलंबून आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP ) आणि महाविकास आघाडी सरकारला ( Mahavikas Aghadi Sarkar ) पाठिंबा देणाऱ्या एका पक्षाने या निवडणुकीत भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे.


पालघर जिल्ह्यात वर्चस्व असणाऱ्या बहुजन विकास आघाडीचे ( Bahujn Vikas Agahdi ) तीन आमदार या निवडणुकीत भाजपच्या बाजूने आपला कौल देणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर ( Shitij Thakur ), हितेंद्र ठाकूर ( Hitrendra Thakur ) आणि राजेश पाटील ( Rajesh Patil ) हे भाजपाला मत देणार आहेत.


बहुजन विकास आघाडीच्या या तीन मतांमुळे भाजपचे पारडे जड झाले आहे. विधानसभेत छोट्या पक्षांचे एकूण 16 तर 13 अपक्ष आमदार आहेत. या 29 आमदारांच्या हाती राज्यसभेवर जाणाऱ्या सहाव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे.