Ayodhya Ram Mandir : तब्बल 500 वर्षांनंतर श्रीराम अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले आहेत. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठापणेचा सोहळा अवघ्या जगाने याची देही याची डोळा पाहिला. या सोहळ्यासाठी देशभरातील दिग्गजांसह बॉलिवूड, खेळ जगतातील खास पाहुणे उपस्थितीत होते. आशियातील श्रीमंत अंबानी कुटुंबही या सोहळ्याला खास करुन आले होते. आपल्या लाडक्या श्रीरामाच दर्शन घडाव अशी प्रत्येकाची इच्छा आहे. 23 जानेवारीपासून या भव्य मंदिरात रामलल्लाचं रुप डोळ्यात सामविण्यासाठी देशभरातील भाविकांनी एकच गर्दी केली आहे. जर तुम्ही देखील अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जाणार आहात आणि तेही पुण्यावरुन रेल्वेने तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. (Ram Mandir Going pune to Ayodhya by train Then read this news first special trains)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणेकरांना अयोध्यासाठी विशेष रेल्वे गाड्या 30 जानेवारीपासून सोडण्यात येणार आहे, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहेत. त्यामुळे पुणेकरांना रामलल्लाच्या दर्शनासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. 


अयोध्येतील गर्दीमुळे पुण्यातून सुटणारी विशेष रेल्वे गाडी पुढे ढकल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. गेल्याच आठवड्यात सुरु झालेले या मंदिरात भाविकांनी तुफान गर्दी केली आहे. उत्तर प्रदेश पोलीस आणि मंदिर प्रशासनाला ही गर्दी नियंत्रण ठेवण्यासाठी शर्थीच प्रयत्न करावे लागत आहे. पुण्यातून विशेष रेल्वेने असंख्य भाविक जर अयोध्येत दाखल झाल्यास गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जाईल म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याच बोलं जात आहे. 


30 जानेवारीपासून पुण्यातून अयोध्येसाठी 15 विशेष गाड्या निघणार होत्या. एका रेल्वे गाडी साधारण दीड हजार प्रवासी प्रवास करता. अशात 15 विशेष गाड्यांमधील प्रवाशांची संख्या पाहता अयोध्येतील गर्दीत लाखोने भर पडणार, अशी शक्यता आहे. गर्दीमुळेच  या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याच असल्याचं सूत्रांची माहिती आहे. 


विशेष म्हणजे या गाड्यांमध्ये एकट्याने तिकीट आरक्षित करता येणार नसून प्रवाशांना समूहांने तिकीट आरक्षित करावी लागणार आहे. इंडियन रेल्वे केटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या सूचनेनुसार किमान 15 प्रवाशांचा समूह यासाठी असणे गरजेचे आहे. आता पुण्यातून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्या नेमक्या कधी सुटणार आहे, याबद्दल अद्याप काही स्पष्ट सांगण्यात आलेलं नाही.