Ram Navami 2024 : रामनवमीनिमित्त नाशिकमध्ये वाहतूक मार्गात बदल; `हे` मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Nashik News : नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रामनवमीनिमित्त शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे.
Nashik Ram Navami : देशभरात रामनवमीनिमित्त उत्साह दिसून येतो. शहरातील राममंदिरात रामनवमी निमित्त धार्मिक सोहळ्याच आयोजन केलं आहे. तर श्रीप्रभूचा आशिर्वाद घेण्यासाठी भक्तांनी मंदिरात रीघ लावली आहे. अशात नाशिक शहरातही काळाराम मंदिरात भक्तांनी गर्दी केली आहे. पंचवटी आणि नाशिक रोड या बाजूला तुम्ही आज कामानिमित्त जाणार असाल तर नाशिक शहरातील वाहतूक मार्गाचे अपडेट नक्की पाहून घ्या. कारण रामनवमीनिमित्त नाशिक शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. (Ram Navami 2024 Traffic route changes in Nashik on the occasion of Ram Navami This way off what are the alternative ways)
नाशिकरोड, मुक्तीधाम परिसर आणि पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात रामनवमीनिमित्त भक्तांची गर्दी उसळणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नाशिक वाहतूक विभागाने मंदिर परिसरातील मार्गांमध्ये बदल केला आहे. काही मार्ग बंद केले आहेत. विशेष म्हणजे आज दुपारी 3 वाजता शहरात रामनवमीनिमित्त मुक्तिधाम मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे. मुक्तीधाम मंदिर, बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन, सुभाष रोड, सत्कार पॉईंटकडून देवळाली गावमार्गे मुक्तिधाम मंदिर असा मिरवणुकीचा मार्ग असणार आहे. या मिरवणुकीत साधारण 20 ते 25 हजार भक्त सहभागी होतील अंदाज पोलिसांना आहे.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील वाहतूक बाबत पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांची गैरसोय होऊन नये यासाठी कुठले मार्ग बंद असेल ते जाणून घ्या.
हे मार्ग असेल बंद
सत्कार पॉईंट ते बिटको सिग्नल मार्ग
रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणारा मार्ग
दत्त मंदिर सिग्नल – बिटको चौक मार्गे रेल्वे स्टेशनकडे जाणारी मार्ग
डॉ. आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशनकडून सत्कार पॉईंटकडे जाणाऱ्या मार्ग
हे आहेत पर्यायी मार्ग
उपनगरकडून रेल्वेस्टेशनकडे जाणारी वाहतूक दत्त मंदिर सिग्नलच्या उजवीकडून सुराणा हॉस्पिटल, आनंदनगरी टी पॉईट – सत्कार पॉईंट – रिपोर्टे कॉर्नरमधून रेल्वे स्टेशनकडे- परत सुभाष रोड मार्गे – दत्त मंदिरा सिग्नल इतरत्र वळवण्यात आली आहे.
रेल्वे स्टेशनकडून सीबीएसकडे जाणारी वाहने जुने नाशिकरोड कोर्ट समोरून आर्टिलरी रोड मार्गे जयभवानी चौकातून उजवीकडे वळून उपनगर सिग्नलकडून तुम्ही जाऊ शकता.
पुणेकडून नाशिककडे येणारी-जाणारी अवजड वाहने, बसेस दत्त मंदिर सिग्नलवरुन वीर सावरकर उड्डाणपुलावरून मार्गस्थ करण्यात आली आहे.
विहितगाव सिग्नलकडून बिटकोकडे जाणारी वाहतूक देवळाली गाव, मालधक्का रोडने रेल्वेस्टेशनकडे फिरवण्यात आली आहे.