Sushma Andhare : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या सुषमा अंधारे महाप्रबोधन यात्रेनिमित्त (Maha Prabodhan Yatra) शिंदे गटासह भाजपला लक्ष्य करत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिलं जातंय. शिंदे गटाने सुषमा अंधारे यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीला पक्षात सामील करुन घेतल्यानंतर त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी सुषमा अंधारे यांना सल्ला दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुषमा अंधारे संघर्षशील वक्त्या


"शिवसेनेने सुषमा अंधारे यांना टीका करण्यासाठी आणलं आहे. अंधारे आमच्याही पक्षात होत्या. पण आता त्या शिवसेनेत गेल्या आहेत. त्या संघर्षशील वक्त्या आहेत. त्या काही वर्षे माझ्या पक्षात होत्या. पण सध्या शिवसेनेत नेत्यांची कमी आहे. त्यामुळे सुषमा अंधारेंना उपनेतेपद दिलं आहे,"  अशी टीका रामदास आठवले यांनी केली आहे.


सुषमा अंधारेंनी सारखी टीका करु नये - रामदास आठवले


"सुषमा अंधारे टीका करण्यात हुशार आहेत. पण त्यांनी सारखी टीका करु नये. टीका करायला हरकत नाही, पण सारखी करु नये," असहे रामदास आठवले म्हणालेत.


शिवसेना संपवण्यासाठी सुषमा अंधारेंना पाठवलय


"राष्ट्रवादीने ठाकरे गटाला संपवण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. अर्धी शिवसेना संपवलीय. आता उरलेली संपवायला सुषमा अंधारेंना पाठवलं आहे. सुषमा अंधारे या पूर्वी काय काय बोलल्या आहेत, हे जनतेसमोर आलं पाहिजे," असं शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.