जालना : राज्य सरकारने जनतेला अन्न धान्याचा अतिरिक्त साठा जनतेला उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकार राज्याला हवा असलेला अन्न धान्याचा साठा राज्याला उपलब्ध करून देण्यास तयार असून राज्य सरकारने ३ महिन्याचा रेग्युलर आणि ३ महिन्याचा अतिरीक्त अन्न धान्याचा साठा जनतेला उपलब्ध करून द्यावा असं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय.ते जालन्यात पत्रकारांशी बोलत होते.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने 3 आठवड्यांसाठी लॉक डाऊन केलंय. या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक राज्यातील समस्या सोडवण्यासाठी येत्या ६ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत असून प्रत्येक राज्यातील केंद्रीय मंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहे.



निवडणूक पुढे 


कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय़ घेतला आहे. येत्या २४ एप्रिल रोजी राज्य विधानपरिषदेच्या ९ जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतील आमदार या निवडणुकीत मतदान करतात. मात्र कोरोनामुळे आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीची पुढील तारीख जाहीर करणार आहे.