औरंगाबाद : गावोगावी जाऊन कर्जमुक्तीचा प्रचार करा असा सल्ला भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना दिला. औरंगाबादेत भाजपा पुरस्कृत नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी रावसाहेब यांनी हा सल्ला दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही देशाचा पंतप्रधान असलेल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात त्यामुळे गावागावात जा प्रत्येक सभारंभात जिथे जाल तिथे आपण दिलेल्या कर्जमाफी बद्दल सांगा आपण शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या योजनांबाबत माहिती द्या अस रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं. 


इतकच नाही तर सरपंच हे महत्वाच पद असल्याने या पदासाठी प्रशिक्षण देण्याची गरज असून सरपंच पदाची आणि पक्षाचा कार्यकर्त्याचे प्रशिक्षण भाजपा देणार असल्याच रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.