नितेश महाजन, झी मीडिया, जालना: बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाशी भाजपचा कोणताही संबंध नाही. केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपवर आरोप होत असल्याचे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. रावसाहेब दानवे यांच्या हस्ते रविवारी नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ज्या पद्धतीने एक एक करून गोष्टी समोर येत आहेत त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतीत आम्हाला कोणताही ठोस दावा करायचा नाही. मात्र, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने CBI चौकशी करुन सत्य लोकांसमोर आणावे. ही चौकशी होऊ नये असे कुणाला वाटत असेल तर मग संशय घ्यायला जागा आहे, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

SSR case: पंतप्रधान मोदींच्या बायोपिकसाठी गुजरात सरकारने संदीप सिंहला पैसे दिले?

तसेच या प्रकरणाशी भाजपचा काहीही संबंध नाही. केवळ लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक भाजपवर आरोप करत असून ही गोष्ट त्यांच्याच अंगलट येण्याची शक्यता आहे, असा इशाराही रावसाहेब दानवे यांनी दिला. 
तत्पूर्वी आज काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. याप्रकरणात सीबीआयकडून सुशांतचा मित्र संदीप सिंह याची चौकशी होण्याची शक्यता आहे.


SSR case: 'संदीप सिंहने भाजप कार्यालयात ५३ वेळा फोन केला होता'


या संदीप सिंहची भाजपशी जवळीक आहे. दीप सिंह याच्या तोट्यात असलेल्या कंपनीसोबत २०१९ साली विजय रुपाणी यांच्या गुजरात सरकारने १७७ कोटींचा सामंजस्य करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपट करण्यासाठी टोकन रक्कम म्हणून गुजरात सरकारने हे पैसे संदीप सिंहला दिले होते का, असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.