बलात्काराच्या घटनेनंतर चार दिवसांनी पीडितेची वैद्यकीय तपासणी
नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका विवाहितेवर बलात्काराच्या घटनेने अंबरनाथ शहर हादरलंय. ही घटना १४ ऑगस्टला रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे या पीडित विवाहितेची वैद्यकीय तपासणी बलात्कार झाल्याच्या चार दिवसांनंतर म्हणजे १८ ऑगस्टला करण्यात आली. त्यामुळे पीडित विवाहितेच्या कुटुंबानं यात हलगर्जीपणाचा आरोप केलाय.
अंबरनाथ : नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या एका विवाहितेवर बलात्काराच्या घटनेने अंबरनाथ शहर हादरलंय. ही घटना १४ ऑगस्टला रात्री घडली. धक्कादायक बाब म्हणजे या पीडित विवाहितेची वैद्यकीय तपासणी बलात्कार झाल्याच्या चार दिवसांनंतर म्हणजे १८ ऑगस्टला करण्यात आली. त्यामुळे पीडित विवाहितेच्या कुटुंबानं यात हलगर्जीपणाचा आरोप केलाय.
घटनेनंतर काही तासांतच मनोज यादवला अटक केली गेली. यानंतर पीडित महिलेला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवलं. मात्र या रुग्णालयात महिला डॉक्टर असूनही या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी झालीच नाही.
त्यामुळे पुढले ३ दिवस या पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी हेलपाटे मारावे लागले. त्यामुळे या पीडितेची वैद्यकीय तपासणी १४ तारखेला झाली का १८ ला, याबाबत पोलीस आणि डॉक्टर दोघांची उत्तरं परस्परविरोधी आहेत. महिला अत्याचाराच्या घटनेबाबत डॉक्टर आणि पोलीस किती संवेदनशील आहेत हेच यातून दिसून येतंय.