हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : एमआयएममधून हकालपट्टी झालेल्या नगरसेवक सय्यद मतीन विरोधात चाकण पोलीस ठाण्यात एका २७ वर्षीय महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा शनिवारी दाखल करण्यात आला असून सध्या मतीन रसीद सय्यद हा अणखी एका बलात्कार प्रकरणात औरंगाबाद येथील कारागृहात शिक्षा भोगत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई आजारी असल्याचे सांगुन एमआयएम नगरसेवकासह दोघांनी पिडित महिलेल्या कारमधुन औरंगाबाद येथे नेले. १८ नोव्हेंबर ते १९  फेब्रुवारी  दरम्यान हा प्रकार घडला. औरंगाबादला पिडित महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पिडित महिलेने चाकण पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असुन औरंगाबाद येथे राहणाऱ्या मतीन रसीद सय्यद आणि हमीद सिद्धिकी मोहसीन रसीद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



पिडित महिला आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असुन याच ओळखीचा फायदा घेऊन हे दुष्कृत्य करण्यात आले.  माजी नगरसेवक मतीन रसीद सय्यदवर औरंगाबाद येथे याआधी दुसरा बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आधीच्या गुन्ह्यात रसीद हा औरंगाबाद कारगृहात न्यायालयीन कोठडीत आहे.