रत्नागिरीत सापडला दुर्मिळ मासा
पांढरा समुद्रकिनारी एक दुर्मिळ मासा आढळून आला आहे.
रत्नागिरी : पांढरा समुद्रकिनारी एक दुर्मिळ मासा आढळून आला आहे. प्रशांत आयरे हे गरीने मासेमारी करण्याकरिता गेले असता, त्यांच्या गळाला हा मासा लागला होता. दरम्यान, आठ ते नऊ इंच लांबीच्या रंगीत माशाचे तोंड उभट घोड्याच्या आकारासारखे आहे.
'ट्रायपॉड' जातीचा हा मासा असून केंड, ट्रिगरफिश सारख्या माशांच्या प्रजातीशी हा मासा निगडीत आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंडोनेशियाच्या किनाऱ्यावर हा मासा आढळतो.
नुकत्याच झालेल्या वादळामुळे बदलत्या प्रवाहाबरोबर तो कोकण किनारी आला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे. रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचा मासा आढळल्याची नोंद यापूर्वी झालेली नाही. प्रथमच असा मासा सापडल्याने या माशाबाबत उत्सुकता आहे.