Rashmi Shukla Phone tapping Case : महाविकास आघाडी सरकारच्या काळात समोर आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात कथित सुत्रधार IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना शिंदे-फडणवीस सरकारने क्लिनचीट दिली आहे. रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याचा तपास बंद करण्यात येत असल्याचाअहवाल (क्लोजर रिपोर्ट) पुणे कोर्टात सादर करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे आणि माजी आमदार आशिष देशमुख आणि बच्चू कडू यांचे फोन टॅप केल्या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 


2019 साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेवेळी महाराष्ट्राच्या जनतेने ऐतिहासिक सत्ता नाट्य पाहिलं होतं. शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली होती. हे सत्तानाट्य जवळपास 36 दिवस चाललं होतं. या काळात महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा करण्याता आला होता. 


महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर या प्रकरणाचा तपास मुंबई सेलकडे सोपवण्यात आला होता. त्या काळात रश्मी शुक्ला यांनी त्यावेळी चौकशीसाठी पत्रव्यवहारद्वारे उत्तर देईन असं म्हटलं होतं. त्यामुळे शुक्ला यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू होती.  मात्र आता सरकार बदलल्यावर शिंदे-फडणवीस सरकारने फोन टॅपिंग प्रकरण निकाली लावत शुक्ला यांना क्लिनचीट दिली आहे.