Uddhav Thackeray : आता थेट रश्मी ठाकरे पुढे सरसावल्या; चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर मोठ्या घडामोडी
ShivSenaCrisis and Uddhav Thackeray : केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे 'शिवसेना' (Shiv Sena) हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातातून गेले आहे. चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्ह दोन्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अर्थात शिंदे गटाला मिळाले आहे. यानंतर उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. निवडणुकीत चोरांना गाडून टाकू, आता डंख मारायची वेळ आलेय असा निर्धार उद्धव ठाकरेनी व्यक्त केला. मातोश्रीवर ठाकरे गटाचं जोरदार शक्तिप्रदर्शन पहायला मिळाले. चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर मोठ्या घडामोडी घडत असताना उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) देखील पुढे सरसावल्या आहेत.
पुण्याहून आलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना रश्मी ठाकरे मातोश्रीवर भेटल्या. यावेळी मातोश्री हीच आमची चंद्रभागा उद्धव साहेब हेच आमचे विठ्ठल... ठाकरे परिवार आणि शिवसैनिक हेच आमचे पंढरपूर..असा बॅनर या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणला होता... हे पोस्टर या कार्यकर्त्यांनी रश्मी ठाकरे यांना भेट म्हणून दिलं आहे. यावेळी रश्मी ठाकरे हसून कार्यकर्त्यांचे स्वगत करत त्यांना प्रोत्साहीत केले.
एकनाथ शिंदे कडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल
एकनाथ शिंदे कडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आलंय. आपली बाजू ऐकल्याशिवाय सुप्रीम कोर्टाने निर्णय घेऊ नये अशी विनंती एकनाथ शिंदेंनी सुप्रीम कोर्टात केलीय. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयावर ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी कॅव्हेट दाखल केले आहे.
मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची बैठक
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गट सोमवारी सुप्रीम कोर्टात दाद मागणार आहे. आज मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदार-खासदारांची बैठक झाली. त्यामध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसंच मशाल चिन्ह हे शिवसेनेला साजेसं होतं, मात्र ते चिन्ह गेल्यास शिवसेनेला शोभेल असं चिन्ह कुठलं निवडता येईल, यावरही बैठकीत चर्चा झाली.
ठाकरे गटानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या नावात बदल केले
पक्ष आणि निवडणूक चिन्ह हातातून गेल्यानंतर आता ठाकरे गटानं आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सच्या नावात बदल केले आहेत. शिवसेनेनं यूट्यूब आणि ट्विटर अकाऊंट्चं नाव शिवसेना यूबीटी असं केल आहे.
Uddhav Thackeray : आता थेट रश्मी ठाकरे पुढे सरसावल्या; चिन्ह आणि पक्ष गेल्यानंतर मोठ्या घडामोडी