इंदापूर विधानसभा जागेवर रासपचा दावा, जानकरांचा प्रयत्न सुरु
इंदापूरची जागाही मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महादेव जानकरांनी म्हटले आज आहे.
इंदारपूर : भाजप - शिवसेना युतीच्या माध्यमातून जागावाटपात दौंड मतदारसंघ रासप अर्थात राष्ट्रीय समाज पक्षाला मिळाला आहे. आता इंदापूरची जागाही मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी म्हटले आज आहे. ते इंदापुरात राष्ट्रीय समाज पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. जागावाटपात इंदापूरची जागा कुणालाही मिळाली तरी रासपचाच आमदार झाला पाहिजे, त्यासाठी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जानकरांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचा १६वा वर्धापन दिन दादर येथील शिवाजी पार्कमध्ये महामेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात महादेव जानकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार प्रवीण दरकेर आणि राहुल कुल हे नेते उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर महादेव जानकर यांनी शक्तिप्रदर्शन केले होते.
या विधानसभेसाठी भाजपने आपल्या पक्षाला ५७ जागा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. गेल्या १६ वर्ष रासप चार राज्यात काम करत आहे. मात्र पक्ष आता बाकीच्या राज्यात काम करण्यासाठी सुरुवात करणार आहे आम्ही आमच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहोत, असे म्हटले होते. एक जागा पदरात पाडून घेतल्यानंतर आणखी कशी जागा मिळतील यावर रासपने लक्ष केंद्रीत केले आहे.