अहमदनगर : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या दिल्ली इथे सुरु असलेल्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राळेगण ग्रामस्थ वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनं करीत आहेत. आज ग्रामस्थांनी नगर पुणे रस्ता अडवला. राळेगणसिद्धी गावापासून जवळ असलेल्या वाडेगव्हाण गावात हा रस्ता रोको करण्यात आला. 


शोलेस्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एरवी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारे राळेगण ग्रामस्थ यावेळी काहीसे आक्रमक झाल्याचे चित्र आहे . पुतळा दहन , शोलेस्टाईल पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन आणि रस्ता रोको असे मार्ग राळेगण ग्रामस्थ अवलंबित आहेत. आजच्या  रस्ता रोकोमुळे नगर- पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 



अण्णांच्या आंदोलनावर भाजपचं बाराकाईनं लक्ष


नवी दिल्लीतल्या रामलीला मैदानावरील अण्णांच्या आंदोलनावर भाजपनं बाराकाईनं लक्ष ठेवलंय. रामलीला मैदानातील सीसीटीव्हीचं कनेक्शन थेट भाजप मुख्यलायत देण्यात आलंय. अण्णांच्या आंदोलनाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी हे सीसीटीव्ही लावण्यात आलेय. 


रामलीला मैदानावरील लॅपटॉपच्या स्क्रीनवर भाजप मुख्यालयाचं नाव आहे. त्यामुळं रामलीला मैदानावरील सर्व हालचालींची नोंद भाजप कार्यालयात घेतली जात असल्याचं या निमित्तानं स्पष्ट होतंय.