पुणे : Ration shop News : बातमी सर्वसामान्यांची. आता सर्वसामान्यांच्या ताटातून चपातीही कमी होणार आहे. कारण स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानात मिळणाऱ्या गव्हाच्या (wheat) प्रमाणात कपात करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रास्तधान्य दुकानात आता गहू कमी मिळणार आहे. सर्वसामान्यांना आधार असलेल्या रेशनवरील गहू कमी झाला आहे. रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. खुल्या बाजारात गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. या युद्धाचा भारतातही परिणाम दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाजारातून गहू खरेदी करणे न परवडणार्‍या व्यक्तींसाठी रेशनचा पर्याय लाभदायक ठरतो. परंतु आता पुरवठा विभागाने रेशनवरील गहू (wheat) कमी करुन त्याऐवजी तांदूळ ( rice) देण्याचा निर्णय घेतला आहे. गव्हाचे उत्पादन कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु आहे. रेशन दुकानात प्रती कुटुंब 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ दिला जात होता. मात्र आता 1 किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे.


परंतु राज्याच्या पुरवठा विभागाकडून त्याबाबत अधिकृत सांगण्यात आलेले नाही. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सर्व जिल्हाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. प्राधान्य कुटुंबांना तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ दिले जात होते. त्याऐवजी आता एक किलो गहू आणि चार किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला गेला आहे, अशी माहिती हाती आली आहे.