रत्नागिरी नगराध्यक्ष पोटनिवडणूक : भाजप दिग्गजांना अपयश, शिवसेनेची बाजी
शिवसेनेने बाजी मारत नगरपरिषद आपल्याकडे राखली आहे.
रत्नागिरी : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. राज्यपातळीवरील नेते नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत उतरले होते. आम्हीच ही निवडणूक जिंकणार असा दावा केला होता. मात्र, शिवसेनेने बाजी मारत नगरपरिषद आपल्याकडे राखली आहे. नगराध्यक्ष पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी १०९२ मतांनी विजयी झालेत. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढतीत शिवसेनेने बाजी मारत भाजपला धोबीपछाड केले.
भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली. शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांनी जोरदार टक्कर दिली. त्यांनी चांगली मते घेतल्याने शिवसेनेसाठी हा विजय सोपा झाला. भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर या निवडणुकीत प्रामुख्याने मंत्री उद्य सामत, खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी आपली बाजी लावली होती. रत्नागिरी नगपरिषदेत शिवसेनेकडे एकहाती बहुमत आहे. २४ विद्यमान नागरसेवसक असून भाजपला रोखत शिवसेनेचा १०९२ मतांनी विजय झाला.
या निवडणुकीत शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत यांनी प्रचाराची धुरा एकहाती सांभाळत हा विजय मिळवला आहे. तर भाजपने या निवडणुकीत सगळे दिग्ग्ज नेते उतरवून देखील काहीही फायदा झालेला नाही. भाजपने या निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषद विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, खासदार नारायण राणे, आमदार संजय केळकर, रवींद्र चव्हाण, निरंजन डावखरे, चित्राताई वाघ असे दिगज्ज नेते या निवडणुकीत उतरवले होते. तसेच आमदार प्रसाद लाड याठिकाणी आठ दिवस तळ ठोकून होते. मात्र असं असून देखील भाजपला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी ४७.३८ टक्के मतदान झाले होते. प्रदीप तथा बंड्या साळवी यांना १० हजार ७ मते मिळालीत. तर भाजपचे उमेदवार डॉ. दीपक पटवर्धन यांना ८ हजार ८२५ मते मिळालीत. तर राष्ट्रवादीचे मिलिंद कील यांना ८ हजार २५२ मते मिळालीत. मनसेचे उमेदवार रुपेश सावंत यांना ४१९ मते मिळालीत. शिवसेनेचा विजय झाल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडत जोरदार जल्लोष साजरा केला.
रत्नागिरीत पुन्हा एकदा सामंत बंधूनी राजकीय बाजी मारण्यात यश मिळवले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने भाजपला धोबीपछाड करत विजय मिळवला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी म्हणाले, भाजपने केवळ हवा केली. त्यांचा पराभव निश्चित होता. त्यांचे अनेक नेते येथे आलेत. मात्र, त्यांचा प्रभाव हा रत्नागिरीत पडलेला नाही. येथील विकास शिवसेना करु शकते, हाच येथील जनतेला विश्वास आहे. त्यामुळे भाजपला चांगलाच धडा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया दिली. हा शिवसेना एकजुटीचा विजय आहे, असेही ते म्हणालेत.