Lok Sabha Election Results 2024: रावेर मतदारसंघातून महायुतीच्या रक्षा खडसे विजयी होणार असं निश्चित मानलं जात आहे. मतमोजणीच्या सतराव्या फेरीनंतर रक्षा खडसेंनी 1 लाख 95 हजार 46 हजार मतांनी आघाडी मिळवली आहे. 17 व्या फेरीनंतर रक्षा खडसेंना 4 लाख 71 हजार 14 मतं होती. तर महाविकास आघाडीच्या श्रीराम पाटील यांना 2 लाख 75 हजार 968 मतं मिळाली. सुनेने आघाडी घेतल्यानंतर भाजपाच्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. महाविकास आघाडी सरकारला एवढं यश का मिळालं यासंदर्भात एकनाथ खडसेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 


कोणाला किती मतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 लाख 95 हजार 46 हजार मतांनी रक्षा खडसेंनी आघाडी मिळवल्याने त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. रक्षा खडसे जवळपास दोन लाख मतांच्या आघाडीवर आहेत. रक्षा खडसे या तिसऱ्यांदा जवळपास अडीच लाख मतांनी निवडून आलेल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून रक्षा खडसे विजय होतील की नाही त्यांना तिकीट मिळेल की नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. रावेर लोकसभा मतदारसंघात जातीपातीचा कुठलाही परिणाम या मतदारसंघावर झाल्याचं दिसून आलेलं नाही. प्रत्येक समाजाने रक्षा खडसे यांना भरभरून मत दिल्याचं या निकालातून दिसत आहे. मागील काळात काँग्रेसच्या उमेदवाराला जेवढी मते मिळाली होती तेवढीच मत आता विरोधी उमेदवाराला मिळाली आहेत. 


नक्की वाचा >> अजित पवारांनी 'कसा जिंकून येतो' म्हणणारा उमेदवार दीड लाख मतांनी जिंकला


यामुळे महायुतीचा पराभव झाला


"एखाद्या उमेदवाराला तिसऱ्यांदा निवडून येणं कठीण असतं मात्र रक्षा खडसेंचा जनतेशी ठेवलेला जनसंपर्क आणि त्यांनी केलेलं काम यामुळे विजय मिळाला आहे, " अशी प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी रक्षा खडसे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्रातल्या महायुतीच्या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मी वक्तव्य केलं होतं की महाराष्ट्रात महायुतीला कमी जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळतील," अशी आठवण खडसेंनी करुन दिली. "महाराष्ट्राच्या जनतेला फोडाफोडीचं राजकारण काही पटलेलं नाही. अनेक जणांना हे कारण वेगळं वाटत असलं तरी ही वस्तुस्थिती आहे," असं म्हणत एकनाथ खडसेंनी महायुतीच्या कमी जागांवर आपलं मत व्यक्त केलं.


महाराष्ट्रामधील सर्व मतदारसंघांचे निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.