डोंबिवलीत आमदार रविंद्र चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक
रविंद्र चव्हाण यांची पुन्हा एकदा बाजी
डोंबिवली : भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला असणाऱ्या डोंबिवली मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा कमळ फुललंय. विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आपल्या विजयाची हॅटट्रिक केलीय. सलग तिसऱ्यांदा डोंबिवलीकरांनी चव्हाण यांच्या गळ्यात विजयाची माळ टाकत संघाचा बालेकिल्ला हा विश्वास पुन्हा एकदा सार्थ ठरवला.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा ४० हजार मतांनी विजय झाला आहे. मनसेचे मंदार हळबे यांचा त्यांनी पराभव केला आहे. डोंबिवलीत विकासाच्या मुद्द्यावरच प्रचार झाला होता. पण पुन्हा एकदा रविंद्र चव्हाण यांनी बाजी मारली आहे. थोपवून धरण्यात रविंद्र चव्हाण यांना यश आले आहे. आमचा विजय हा महायुतीच्या विचारधारेचा विजय असल्याचे मत रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. येत्याकाळात डोंबिवलीतील समस्यांचा अपप्रचाराचा फटकाही आम्हाला बसल्याचेही त्यांनी सांगितले.