Pune Loksabha Election 2024 : पुण्यातील सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar Accused On BJP) यांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केलाय. पोलीस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) आक्रमक झाले आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यातच धंगेकरांनी ठिया मांडला. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू झालं आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, असं म्हणत धंगेकरांचं निषेध आंदोलन सुरू झालं आहे. त्यामुळे आता पुण्याच्या निवडणुकीवर सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीये.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मोठी कारवाई १६ मार्च ते १० मे आचारसंहिता कालावधीत २ कोटी ६५ लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त एकूण ६६१ आरोंपीना अटक करण्यात आलीय तर ८९ वाहने जप्त केली आहेत. विशेषता पुणे, मावळ आणि शिरूर बारामती लोकसभा मतदारसंघात परिसरात ही कारवाई आहे. तर मदतीसाठी हेल्प लाईन नंबर १८००२३३९९९९ जाहीर करण्यात आला आहे. तर उद्याच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर आजची रात्र विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्काचे अधीक्षक चरणसिंग रजपूत यांनी झी 24 तासला माहिती दिलीय.


निवडणुकीच्या काळात पुण्यात तब्बल 4 कोटींची दारू पकडली आहे. नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर 100 मिनिटात कारवाई केली जाते. काही बोगस तक्रारी देखील येत आहेत. निवडणुकीच्या दिवशी काही घटना झाल्यास तत्काळ भरारी पथक जाऊन कारवाई केली जाते. पुण्यात मतदानासाठी विकलांग लोकांसाठी विशेष सुविधा देखील देण्यात येत आहेत. पाऊस जरी आला तरी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही तयारी करत आहोत, अशी माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८३ लाख मतदार आता ३ मतदारसंघात ६० लाखपेक्षा जास्त मतदार आहेत. पुणेकर सर्व गोष्टीमध्ये पुढे असतात मतदानाला देखील मागे मागे राहू नका, मतदानाची आकडेवारी वाढवण्यासाठी पुणे निवडणूक विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. पुणेकरांनी मतदानाचा हक्क बाजावावा असं पुणे जिल्हा अधिकाऱ्यांचे आव्हान आहे.